कोकणातला गणेश उत्सव हा कोकणी माणसासाठी भावनिक आणि उत्साहचा सण . जरी कामावर सुट्टी नसेल तरीही कोकणातला प्रतेक चाकरमानी या उत्सवाला आवर्जून हजेरी लावतो . मी पण कोकणातला असल्यामुळे मी देखील दरवर्षी या गणेश उत्सवाला आवर्जून माझ्या गावी जातो. या वर्षीही मी एसटी ने प्रवास केला,पण मुंबई गोवा हायवे वर प्रचंड ट्राफिक असल्यामुळे माझाच नाही तर कोकणात जाणार्या सर्व चकरमान्यांचा प्रवास अतिशय खडतर झाला . ट्राफिक जॅम मुळे प्रतेक मनसाच्या चेहर्यावरचे भाव दिसत होते . प्रतेकला ओढ लगली होती ती लवकरात लवकर घरी पोहचण्याची आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची ..

0 Comments